क्राईम न्युज

भरधाव टँकर खाली अवघ्या १ वर्षाच्या बाळाचा अंत ; काळेपडळ..

पुणे (हडपसर) : काळेपडळमध्ये पाण्याच्या टँकरची का लागते आवश्यक्यता ? टँकर चा मालक कोण ? चालकाला कोणत्या कशा पद्धतीने ठेवले कामावर या साऱ्यावर का बाळगलेय मौन ?

अशाच एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पाण्याच्या टँकर खाली काळेपडळ येथे अवघ्या १ वर्षाच्या बाळाचा करूण अंत झाला. या प्रकरणी पोलिसांनी विजयकुमार बालाजी फड, वय ३२ वर्षे, रा. लोहगाव, पुणे नावाच्या टँकरचालकाला अटक केली आहे. मात्र हा टँकर कुणाच्या मालकीचा होता ,या चालकाला त्याने तो कोणत्या पद्धतीने कामावर ठेऊन चालवायला दिला याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. बबीतादेवी गहतो वय २२ वर्षे, रा. ऊरळी देवाची, फुरसुंगी, पुणे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. काल दि.२१/०१/२०२५ रोजी दु.३ वाजता रोजी पी एम प्लॅस्टीक भंगाराच्या दुकानासमोर, ऊरळी देवाबी फुरसुंगी, पुणे येथे हि दुर्घटना घडली

यातील चालकाने त्याचे ताब्यातील पाण्याचा टँकर हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, फिर्यादी यांचा लहान मुलगा कृष्णा राहुल महातो वय ०१ वर्षे, हा घराच्या बाहेर खेळत असताना टँकर हा त्याचे अंगावरून गेल्याने त्यात तो मयत झाला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे मो. नं.८८८८८८३५८२ हे या प्रकरणी तपास करत आहेत . हा टँकर कुणाच्या मालकीचा होता ,या चालकाला त्याने तो कोणत्या पद्धतीने कामावर ठेऊन चालवायला दिला याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. काळेपडळमध्ये थंडीच्या दिवसातही पाण्याच्या टँकरची का लागते आवश्यक्यता या प्रश्नाचे उत्तरही कोणी दिलेले नाही. पोलीस या घटनेचा कसुन तपास करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??