१६ लाख ६७ हजार ८०० रूपये किंमतीचा ४० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त.; गुन्हे शाखेची कारवाई..

तुळशीराम घुसाळकर) हवेली
पुणे (हवेली) : अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस पथकाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत दोन परप्रांतीयांना अटक करुन त्यांचेकडे मिळून आलेला १६ लाख ६७ हजार ८०० रूपये किंमतीचा ४० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भरतकुमार दानाजी राजपुरोहीत, (वय ३५) व आशुसिंग गुमानसिंग दोघे राहणार राज्य-राजस्थान दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (२४ जानेवारी) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व स्टाफ लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीवरून लोणकर वस्ती परिसरात असलेल्या ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी दोन इसम अंमली पदार्थ घेऊन उभे असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तेथे पोहोचले. त्यावेळी तेथे दोन जण उभे होते. पोलीसांनी त्यांना हटकले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना पाठलाग करून पकडले व झडती घेतली असता त्यांचेकडे १६ लाख ६७ हजार ८०० रूपये किंमतीचा ४० किलो ३९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. तो जप्त करून त्याचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं.४५/२०२५. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) () (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.१. श गणेश इंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते रेहाना शेख, नुतन बारे, यांनी केली आहे.



