क्राईम न्युजजिल्हा

आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक, घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस, सुमारे ३५ तोळे वजनाचे सोने व २ किलोग्रॅम वजनाची चांदी असे एकूण ३० लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व लोणावळा शहर पो स्टे ची कारवाई…

पुणे : लोणावळा शहर पो.स्टे गु.र.नं. २३२/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१(३) (४) प्रमाणे दि.०९/०६/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे. गुन्हयातील फिर्यादी नामे विना नारायण मुळे वय ६५ वर्षे रा. राजुजी कॉलनी, जुना खंडाळा रोड, लोणावळा ता. मावळ जि पुणे या एकटयाच त्या ठिकाणी राहत असून त्यांना दोन मुली आहेत. दि २५/०५/२०२५ रोजी त्यांची मुलगी अबोली हिचे कडे आंबेगाव बु।। पुणे येथे गेल्या होत्या. त्यानंतर दि. ०९/०६/२०२५ रोजी सकाळी विना मुळे यांचे घरी चोरी झाल्याचे त्यांचे शेजारी श्री मॉरीस यांनी विना मुळे यांना फोन करून सांगितले. त्यानंतर विना मुळे या त्यांची मुलगी अबोली हिचे सह लोणावळा येथे आल्या. त्यांचे घरात चोरी झाली होती, कुलुप तोडणेत आलेले होते व एकूण ४७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २ किलो ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, असा एकूण २९,२६,०००/- मुद्देमाल चोरी गेलेबाबत फिर्यादी विना नारायण मुळे यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
पावसाळा सुरू झालेनंतर मालमत्ता चोरीचे गुन्हयांत वाढ होत असते, त्याचप्रमाणे लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या परिसरात फिरण्यासाठी येतात. भाडेतत्वावर घेण्यात येणारे बंगले, तसेच स्थानिक रहीवासी यांचे बंद घरे या ठिकाणी घर फोडी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणची घटना हि रात्रीचे वेळी घडलेली असल्याचे निष्पन्न झाले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता, गुन्हयात तीन आरोपींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. फुटेजची तपासणी केली असता, तीनही चोरटे हे लोणावळा स्टेशन कडे जावून रेल्वेने पिंपरी चिंचवड येथे गेले असल्याचे समजले. तपासादरम्यान उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज हे गोपनीय बातमीदारांना पोहचविण्यात आले होते. दि १६/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिंचवड परिसरात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार चंदू माने रा. चाफेकर नगर झोपडपट्टी चिंचवडगाव पुणे याने त्याचे इतर साथीदाराचे मदतीने केला असून तो त्याचे साथीदारासह वडगाव मावळ येथे गेलेला असल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव मावळ परिसरात भर पावसात त्याचा शोध सुरू केला, पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळेच आरोपी चंदू माने हा वडगाव मावळ जुना मुंबई-पुणे बायपास रोडवरील एका झाडाखाली त्याचे एका साथीदारासह उभा असताना मिळून आला. त्यांना पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. आरोपी १) चंद्रकांत अनंत माने ऊर्फ चंदू वय ३२ वर्षे, चाफेकरनगर, झोपडपट्टी, चिंचवडगाव पुणे, २) धनंजय हरीष काळे वय २० वर्षे, रा. भारतनगर, झोपडपट्टी, चिंचवडगाव पुणे, यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी लोणावळा येथे घरफोडी चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोर्पीना लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. आरोपींना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेवून तपास करता, आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने व चांदीची भांडी ही आरोपी ३) दिपक शिवाजी मंदगे, वय ३८ वर्षे रा. पाटील आळी, कर्जत, जि. रायगड ४) कैलासचंद्र धगनलाल जाट, वय ४० वर्षे रा. स्वस्तीक व्हिला, सेक्टर ११, वाशी यांचे मदतीने विक्री केले असल्याचे समजले. त्याप्रमाणे त्या दोघांना ताब्यात घेवून तपासादरम्यान ३४ तोळे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २ किलो ग्रॅम वजनाची चांदीची वीट असा एकूण ३० लाख ०१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
यातील आरोपी चंद्रकात माने याचेवर सुमारे ५० हून अधिक घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत ठेवतो. त्याचेवर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पिंपरी चिंचवड, पुणे शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वीच चंद्रकांत माने हा चेन्नई येथील घर फोडीचे गुन्हयातून जामीनावर बाहेर आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे प्रभारी लोणावळा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो स्टे चे पो नि राजेश रामाघरे, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, लोणावळा शहर पो स्टे चे सपोनि राहूल लाड, ग्रेड पोसई रमेश भिसे, ग्रेड पोसई सुर्यकांत वाणी, स्थागुशा चे पोलीस अंमलदार, राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, ग्रेड पोसई मुकुंद कदम लोणावळा शहर पोस्टे पोलीस अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पो स्टे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहेत.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??