हवनयुक्त भैरवचंडी यज्ञ, १६ फ्रेबुवारीला डोंबिवलीत, स्वामी सेवा समजून सांगण्याचा उद्देश ; गुरुवर्य अविनाश (दादा) बडगुजर.
हवनयुक्त भैरवचंडी रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आदरणीय गुरुवर्य अविनाश दादांचे मार्गदर्शन : १२.११ ते २ वेळेत संपन्न होणार...

सुषमा बुर्डै / पिंपरी चिंचवड
पुणे : श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुण आदरणीय गुरुवर्य अविनाश (दादा) बडगुजर यांच्या माध्यमातून ऑनलाइन स्वामी सेवेचा झेंडा रोवणाऱ्या श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराचा हवनयुक्त भैरवचंडी रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आदरणीय गुरुवर्य अविनाश दादांचे मार्गदर्शन : १२.११ ते २ वेळेत संपन्न होणार. (स्थळः श्री वरद सिद्धी विनायक सेवा भवन, भोपर रोड, डोंबिवली पूर्व ४२१२०४) येथे संपन्न होणार आहे.
श्री गणेशाय नमः स्वामी सेवेचा वसा हे स्वप्न प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणे व आदरणीय अविनाश दादांचे मार्गदर्शन जगभर नेणारा श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार या ग्रुपची सुरुवात मार्च २०२० मध्ये झाली. या ग्रुपच्या माध्यमातून अध्यात्मिकतेचे महत्त्व पटवून देणे, बालसंस्कार व युवा पिढी मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या सेवाही घेतल्या जातात. जसे दररोज स्वामी चरित्र सारामृतपाठ, दुर्गा सप्तशती पाठ, रुद्र पाठ, श्री यंत्राची सेवा, गणपती अथर्वशीर्ष या सर्व सेवा प्रत्येक सेवेकरी स्वतः घरात बसून ऑनलाइन टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून करत आहेत.
भागवत ग्रंथ, गुरुचरित्र व नवनाथ पारायणाचे महत्त्व या या माध्यमातून सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. त्याचबरोबर ज्यांचे दुःख, अडचणी आहेत त्या प्रश्न उत्तराच्यामार्फत सेवा देऊन, त्यांचे प्रश्न सोडवले जातात. स्वामी सेवेकरी हा सरळमार्गी व निःस्वार्थी असावा हा वसा जो प्रत्येकाच्या घरात पोहोचवेल व जे जे दुःखात, अडचणीत आहेत त्यांना स्वामी सेवेत आणेल व त्यांचे दुःख सोडवेल त्यांच्या पाठीशी स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव असेल.
या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र व देशभर स्वामी सेवेकरी जोडले गेले आहेत, पण आदरणीय अविनाश दादा ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व सेवेकऱ्यांना आशिर्वाद रुपी भेटत असतात. श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे, प्रमुख अविनाश दादांच्या इच्छेनुसार संपूर्ण महाराष्ट्रत सेवेकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून स्वामी आशिर्वाद देऊन, स्वामी सेवा समजून सांगण्याचा मानस आहे. तरी मुंबई नगरी येथील डोंबिवली शहरात तसेच आजूबाजूच्या शहरातील सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी या अमृततुल्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, हवनयुक्त भैरवचंडी कार्यक्रमासाठी प्रवेश फी रु. २०० प्रति व्यक्ती असेल. व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराकडून करण्यात आले आहे.
या भव्य मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे, श्री स्वामी समर्थ सेवेकरी, पुनम बाळसराफ, दिनेश बाळसराफ, कौशिक खताते, कावेरी खताते, विद्या घरात, विठ्ठल सरगर, राहुल बडगुजर, चेतन सावदेकर, मधुरा बडगुजर, स्वाती बडगुजर, कविता जाधव, आदिती शिंदे, अर्चना पाटील यांनी या भव्य मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




