क्राईम न्युज

पुण्यातील PSI ने उचललं टोकाचं पाऊल ; गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर…

टायगर पाईंटजवळ आढळली कार...कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं..

पुणे : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्यानं, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अण्णा गुंजाळ असं पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, मात्र तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. दरम्यान, आज त्यांचा शोध लागला असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पाँईटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता, या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??