सोसायटीच्या जनरेटर रुममधील बॅट-या चोरणारा चोरटा जेरबंद, १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हडपसर) : काळेपडळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सोसायटीच्या जनरेटर रुममधील बॅट-या चोरणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. या कारवाईत १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिद शरिफ शहा (वय १९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ एक्साईड कंपनीच्या बॅट-या आणि १ अॅक्सेस मोपेड असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काळेपडळ पोलीस ठाण्यात सोसायटींच्या जनरेटर रुममधील बॅट-या चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार पोलिस हवालदार प्रतिक लाहीगुडे, अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महंमदवाडी परिसरात लावण्य हॉटेलजवळ सापळा रचून आरोपीला चोरीच्या बॅटरीसह व मोपेडवर पकडले.
सदर आरोपीने आपल्या दोन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार उर्वरित तीन बॅट-या झुडीओ मॉलसमोरील मोकळ्या जागेतून हस्तगत करण्यात आल्या.
या कारवाईत ६० हजार रुपये किमतीच्या ४ बॅट-या व १ लाख रुपये किमतीची मोपेड असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, श्रीकृष्ण खोकले तसेच अंमलदार शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे आदींचा समावेश होता.
Editer sunil thorat




