क्राईम न्युज

हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, महिलेसह ३० लिटर दारू पकडली, अंदाजे ३ हजार रुपये मुद्देमाल जप्त ; थेऊर

पुणे (हवेली) : खुलेआम सुरु असलेल्या हातभट्टी विक्रीच्या धंद्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता.१३) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास थेऊर येथे छापा टाकला असता या छाप्यात पोलिसांनी एका महिलेसह सुमारे ३ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.

भारती विक्रम कसबे (वय ३५, रा. थेऊर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी कर्त्यव्य बजावीत होते. तेव्हा थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर कॉलनीच्या परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा दारू विक्री चालू आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा भारती कसबे या हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आल्या. पोलिसांनी या कारवाईत एका प्लॅस्टीक कॅन्डमध्ये हातभट्टीची सुमारे ३० लिटर दारू पकडली असून तिची बाजारात अंदाजे ३ हजार रुपये इतकी किंमत आहे. तर आरोपी महिला भारती कसबे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलिस हवालदार, चंद्रकांत माने, विजय जाधव, विशाल बनकर, पोलिस अंमलदार प्रशांत सुतार, तौफिक सय्यद, प्रसाद ताम्हाणे, महिला पोलिस सरिता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??