महिलेचा विनयभंग, आरोपीविरुध्द पाठवीले २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र ; लोणी काळभोर पोलीसांची कामगिरी..

पुणे (हवेली) : दिनांक १७/०३/२०२५ रोजी दुपारी १६/०० वा. चे सुमारास, एका इसमाने लोणी काळभोर गावातील महिलेचा हात हातामध्ये धरुन “तु मला सोडुन येथुन जाऊ नकोस, तु मला खुप आवडतेस, मी तुझ्यावाचुन जगु शकत नाही, माझेशी प्रेमसंबंध ठेव” असे म्हणाला व पिडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यावेळी आरोपीचा हात झटकुन पिडीत महिलेने त्यास धक्का दिला. त्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीस मारहाण व शिवीगाळ करुन धमकी दिली. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस पिडीत महिलेने दि. १९/०३/२०२५ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. १३४/२०२५ रोजी बी. एन. एस. कलम ७४, ७८, ११५(२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी सदर गुन्हयाचा तपास अतिशय शिघ्रगतीने पुर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे संकलीत केले. तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी अवघ्या २४ तासांचे आतच आरोपीविरुध्द सबळ व प्रभावी पुरावे प्राप्त करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा कोर्ट केस नंबर १४११/२०२५ दि. २०/०३/२०२४ असा आहे.
तसेच यातील आरोपीस दोषारोपपत्रासह मा. न्यायलायात हजर करण्यात आले होते त्यामुळे मा. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महिला सुरक्षीतता व महिलांना न्याय देण्याचे उदात्त हेतुने, महिलांविरुध्दचे विनयभंगांचे गुन्हयाचा तपास अतिशय शिघ्रगतीने पुर्ण करुन २४ तासांचे आत आरोपीसह मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणेबाबत अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर व राजेंद्र पन्हाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सर्जेराव बोबडे व दप्तरी पोलीस शिपाई किशोर ८६३६ कुलकर्णी यांनी सदर गुन्हयाचा तपास २४ तासांचे आत पुर्ण करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषोरोपपत्र दाखल करुन पिडीत महिलेस न्याय देण्याचे दृष्टीने प्रभावी प्रयत्न केले आहेत.



