पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक २ लाखांची लाज घेताना अटकेत ; पलूस

सांगली (पलूस) : पलूस येथील पोलीस उपनिरीक्षक महेश बाळासो गायकवाड यांनी फिर्यादी अल्फाज फिरोज मुल्ला रा. बांबवडे यांचेकडून ८ लाख रूपयांची मागणी करून त्याती २ लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली यांनी रंगेहात पकडले.
अरोपी गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे कारवाई करून ताब्यात घण्यात आले. ही घटना बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता पलूस पोलस अधिकारी कक्षात गायकवाड यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले.
मिळालेली माहिती अशी अल्फाज हा हॉटेल व्यवसायिक आहे. या व्यतिरिक्त तो फोरेक्स ट्रेडींगचा व्यवसाय देखील करतो.दि. ५ अक्टोबर२०२४ रोजी मारहाणीच्या गुन्हयात तक्रारदार याला सह आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार याला दि.४ जानेवारी रोजी किसान टायर्स पलूस येथून ताबेत घेवून पलूस पोलीस ठाणेत आणून अटकेची भिती दाखवून अल्फाज यांचेकडे १० लाखांची मागणी केली होती. त्याच दिवशी अल्फाज यांचकडून २ लाख रूपये घेवून तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन करुन घ्या असे सांगून सोडून देण्यात आले होते. दि.२० जानेवारी रोजी तक्रारदार यांना सदर गुन्हयात उच्च न्यायालय येथे जामीन मंजुर झाला. त्या नंतर यातील अरोपी गायकवाड यांनी तक्रारदार यांना समक्ष पोलीस ठाणेत बोलावून, फोनद्वारे बोलून बाकीची ८, लाखा रूपये देण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. दि.२५ मार्च रोजी तक्रारदार अल्फाज याला पोलीस ठाण्यात बोलावून उर्वरित ८ लाख रुपये कधी देणार अन्यथा तुझी चारचाकी गाडी नमूद गुन्हयात जप्त करीन तसेच फोरेक्स ट्रेडींग अनुषंगाने तुझी चौकशी चालू आहे. त्यामध्ये तुझेविरुध्द अजून एक गुन्हा दाखल करीन उर्वरित ८ लाख रुपयांची मागणी केली होती. दि.०२ एप्रू रोजी यातील पलूस पोलीस ठाण्याय महेश गायकवाड याच्या आॅफिस मध्ये पडताळणी केली असता गायकवाड यांनी तडजोडी अंती २ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे अल्फाज यांनी पुराव्या सह सादर करताच लाचलुचपत पथकाने सापळा रचून आरोपी महेश गायकवाड यांना रंगेहाथ पकडले.
आरोपी महेश बाळासाो गायकवाड पोलीस उपनिरीक्षक, पलूस पोलीस ठाणे वर्ग-२ यांचे विरुध्द पलूस पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, पोलीस उपअधीक्षक सांगली, विनायक भिलारे पोलीस निरीक्षक, किशोर कुमार खाडे पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे यांनी केली.



