क्राईम न्युज

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर लोणी काळभोर पोलीसांनी सुमारे ३,०१,९५०/- रुपयांच्या, चोरीस गेलेल्या, ५०० किलो तांब्याच्या तारा ३ चोरटयांकडुन केल्या जप्त…

संपादक सुनिल थोरात

पुणे (हवेली) : (दि.०६/०६/२०२५) रोजी रात्री ११/०० वा. इसम नाव समाधान हिराजी डोंगरे रा. थेऊर ता. हवेली, जि. पुणे यांनी त्यांचा टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो नंबर एम. एच. १२ जे. एफ. ५८०५ हा मौजे थेऊर ता. हवेली, जि. पुणे या गावाचे हद्दीतील जय मल्हार हॉटेल समोरील रोडचे बाजुला मोकळ्या जागेमध्ये लावुन ठेवला होता. सदर टेम्पोमध्ये जुन्या जळालेल्या तांब्याच्या तारांचे बंडल ने भरलेली एकुण ५५ पोते ठेवले होते. दि. ०७/०६/२०२५ रोजी सकाळी ०६/३० वा. चे इसम नामे श्री समाधान हिराजी डोंगरे हे त्यांचे टेम्पोजवळ आले असता त्यांना त्यांचे टेम्पोमधील तांब्याच्या तारांचे एकुण ९ पोते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिसुन आले. सदर ९ पोत्यांमध्ये एकुण ४९५ किलो वजानाच्या व ३,०१,९५०/- रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा होत्या. त्या चोरट्यांनी चोरुन नेलेबाबत त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणेस तक्रार नोंदवीली होती.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस अज्ञात आरोपींविरुध्द गु. र. नं. २५०/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.

यावेळी गुन्हा दाखल झाल्याचे नंतर लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र २ टिम तयार करुन त्यांना सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार तपास पथकात नेमणुकीस असलेले पो. शि. ८१०४ प्रदिप गाडे व पो. शि. २८२५ राहुल कर्डीले यांना सदर गुन्हयातील आरोपींबाबत त्यांचे बातमीदारांमार्फत खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपींचा शोध घेवुन त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सापळा रचुन दि. १०/०६/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर आरोपीतांची नावे १) सुरज शाम जाधव वय १९ वर्षे रा. चव्हाण वस्ती, थेऊर ता. हवेली, जि. पुणे २) यश अजित सावंत वय २१ वर्षे रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता हवेली जि. पुणे ३) महेश बस्वराज पुजारी वय २२ वर्षे रा. अशी आहेत.

वरील आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना लोणी काळभोर पोलीसांनी दि. १०/०६/२०२५ रोजी रात्रौ २१/०५ वा. अटक केली असुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकुण ४९५ किलो वजानाच्या व ३,०१,९५०/- रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा जप्त करणेत आलेल्या आहेत.

हा गुन्हा अज्ञात आरोपींविरुध्द दाखल असताना, तसेच आरोपीतांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना लोणी काळभोर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपुर्णरित्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन, त्यांची नावे गुन्हयात निष्पन्न करुन, त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला संपुर्ण माल जप्त केला आहे.

ही उत्कृष्ठ कागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पो. हवा. जाधव, पो. हवा. सातपुते, पो. हवा. वणवे, पो. हवा. भोसले, पो. हवा. माने, पो. हवा. जगदाळे, पो. हवा. देवीकर, पो. हवा. बारगजे, पो. हवा. माने, पो. शि. गाडे, पो. शि. कर्डीले, पो. शि. सोनवणे, पो. शि. शिरगिरे, पो. शि. दडस, पो. शि. पाटील, पो. शि. कुदळे, पो. शि. विर, म.पो.शि. थोरात यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??