हडपसर रामटेकडी येथील नियोजित ७५ में. टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द करणे बाबत, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन…योगेश दत्तात्रय ससाणे…

संपादक सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : योगेश दत्तात्रय ससाणे माजी सभासद पुणे महानगरपालिका यांनी हडपसर – रामटेकडी येथील नियोजित ७५ में. टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द करणे बाबत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत तत्कालीन आयुक्त भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या मिटींग मध्ये हडपसर – रामटेकडी येथे ७५ मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प घाईघाईने मंजूर करून त्यास निधी दिला आहे , तरी याबाबत माझी आपणास विनंती आहे की या हडपसर- रामटेकडी या परिसरामध्ये यापूर्वीच २२०० मॅट्रिक टना पेक्षाही जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प कार्यान्वित असून आणखी नवीन कचरा प्रकल्प याच परिसरामध्ये लादु नये ही आपणांस विनंती. असे निवेदनात योगेश दत्तात्रय ससाणे यांनी म्हटले आहे.
सदर जागेचे भूसंपादन अथवा ती जागा घनकचरा विभागास वर्ग न करता घाईघाईने नवीन प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे. हडपसरला कचरा नगरी करणार का ??? असा संतप्त सवाल समस्त हडपसर मध्ये राहणाऱ्या ५ लाख पेक्षा जास्त नागरिकांना पडला आहे . कारण बहुतांश वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प हे हडपसर -मुंढवा -उरुळी देवाची हांडेवाडी रोड, रामटेकडी, हडपसर इंडस्ट्रियल एरिया याच ठिकाणी असून त्यामुळे समस्त हडपसरकारांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी आमची आपणास सदर प्रकल्प रद्द करण्याची विनंती आहे.
सदर प्रकल्प जर प्रशासनाने आमचा विरोध असताना चालू केल्यास किंवा चालू करण्याचा प्रयत्न केल्यास हडपसर कर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करतील असे माजी सभासद पुणे महानगरपालिका योगेश दत्तात्रय ससाणे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे…




