जिल्हासामाजिक

पीएमपी बसचालक सुधारेनात..! बस चालक बेभान, जनता शांत..

पुणे : पीएमपी बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले जाते. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस उभी करणे, धोकादायक पद्धतीने बस चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची २६०२ बसचालकांवर गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून, १४ लाख १७ हजार ६५० इतके दंड वसूल करण्यात आला आहे.

तरीही पीएमपी चालकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही.

वाढत्या वाहनांमुळे पुण्यातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. यामध्ये चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. अशा खासगी वाहनचालकांवर वाहतूक पोलिस ‘सीसीटीव्ही’ तपासून कारवाई करतात. अनेकवेळा पीएमपी बसचालक बेदरकारपणे बस चालवतात. या बस सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या केल्या जातात; तसेच या बसच्या चालकांकडून सर्रासपणे सिग्नल तोडले जातात. बस थांब्यावर उभी न करता ती रस्त्यामध्ये उभी केली जाते. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच या बसवरील चालकांकडून नियमभंगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. शिवाय तक्ररी वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’ तपासून नियम मोडणाऱ्या पीएमपी बसवर कारवाई केली जाते.

                                कडक कारवाईची गरज… 

गेल्या तीन वर्षांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६०२ बसवर कारवाई केली आहे. त्यांना १४ लाख १७ हजार ६५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तरीही ‘पीएमपी’च्या चालकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. कारण, केलेली कारवाई ही खूपच कमी आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या पीएमपी चालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

                                 कारवाई दृष्टिक्षेपात….

वर्ष २०२२-२३ मध्ये ७२३ जणांवर कारवाई केली असून, तीन लाख ६१ हजारांचा दंड केला आहे. २०२३-२४ मध्ये १,००२ जणांवर कारवाई केली असून, सहा लाख पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ८७७ जणांवर कारवाई केली असून, ९ लाख ९१ हजार ६५० रुपयांचा दंड केला आहे.

                     चालकांकडून केला जातो दंड वसूल… 

नियम मोडणाऱ्या पीएमपी चालकांवर दंडाची कारवाई केल्यानंतर पीएमपी प्रशासन बसचा चालक कोण होता, याची माहिती काढते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम चालकाच्या पगारातून कमी करून घेतली जाते.

अशी आहे आकडेवारी

वर्ष – कारवाई -संख्या दंड वसूल

२०२२-२३ -७२३ – ३ लाख ६१ हजार

२०२३-२४- १,००२ – ६ लाख ५ हजार

डिसेंबर -२०२४ – ८७७ – ९ लाख ९१ हजार (अखेरपर्यंत) माहिती आहे.

                 नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

बसचालकांनी बस संचलनात वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. ज्या बसचालकांवर दंड आकारण्यात आला आहे, ते दंड त्यांच्या पगारातून वसूल केला जाईल. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??