“धक्कादायक” नागरिकांच्या जीवाशी खेळ, क्षेत्रीय कार्यालचे आरोग्य अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ; राहुल शेवाळे, सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा… पहा व्हिडिओ…

पुणे (हवेली) : मुंढवा जॅकवेल मधून पुणे महानगर पालिकेने प्रक्रिया न केलेले गटाराचे दुषित पाणी जुना केनॉल मध्ये सोडल्याचे भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.

पुणे महानगर पालिका मार्फत मुंढवा जॅकवेल मधून प्रक्रिया न करता पुण्यातील सांडपाणी, गटाराचे दुषित पाणी जुना केनॉल मधे सोडल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो की काय असे प्राथमिक दिसून येत आहे. याप्रकरणी प्रक्रिया न केलेले सांडपाणी या जुना बैबी कॅनलमधून सर्रास सोडले जाते. या सोडलेल्या दुषित पाण्याने रोगाचा प्रादुर्भाव होत असून जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बेबी कॅनलच्या परिसरातील साडेसतरा नळी , मांजरी , विठ्ठलनगर , लक्ष्मीकॉलनी , शेवाळेवाडी , फुरसुंगी या भागातील नागरिकांना प्रचंड डासांचा , व दुर्गंधी चा त्रास होत आहे, यामुळे डेंग्यू , मलेरिया वाढत आहे , त्यामुळे जीबीएचा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होऊ शकतो. या दूषित पाण्यामुळे परिसरातील पाणी दूषित असुन पाण्याचा घाण वास येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे राहूल शेवाळे यांनी सांगितले.
याबाबत राहूल शेवाळे यांनी मनपा आयक्तांना भेटून निवेदन दिले आहे परंतू हडपसर क्षेत्रीय कार्यालचे आरोग्य अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असे परिसरातील नागरिक बोलत आहेत.




