पुणे : आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली. महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही दरवाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने हा निर्णय घेताना राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सुविधा नुसार दरवाढीचा विचार केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले की वाढत्या खर्चांमुळे आणि सेवेच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की सामग्रीच्या किमती, कर्मचारी वेतन आणि इतर चालू खर्चांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे सेवेचे दर वाढवणे अपरिहार्य झाले आहे.
        ग्राहकांवर दरवाढीचे परिणाम.. 
ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांवर प्रत्यक्ष परिणाम करेल. आता केस कापणे, दाढी कापणे, ब्युटी ट्रीटमेंट्स आणि इतर सेवा या सर्व गोष्टींसाठी ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतील. यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांवर ही दरवाढ जास्त परिणाम करेल, यात शंका नाही. या दरवाढीवर अजून तरी ग्राहकांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत..
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा