महाराष्ट्रराजकीयसामाजिक
नागरिकांसाठी, लोकनेते नगरसेवक योगेश ससाणे यांचे १५ दिवसांपासून सह्यांची मोहीम सुरु…
निर्णय हा मागल्या दाराने खाजगीकरणाच्या दिशेने ; लोकनेते योगेश ससाणे.

पुणे (हडपसर) : हडपसर येथील ग्लायडीग सेंटर बाबत गेल्या दोन वर्षापासून ९९ वर्षाच्या करारावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेली १५ दिवस नगरसेवक योगेश ससाणे हे नागरिकांसह रस्त्यावर उतरून सह्यांची मोहीम राबविली.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला १ रुपये नाममात्र भाड्यावर ९९ वर्षाच्या कराराने PPP मॉडेल वर सदरची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदरचा निर्णय हा मागल्या दाराने खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे. १८७ रुपये नाममात्र पैशामध्ये एकदा ग्लायडर विमानामध्ये बसता येतं व ज्यांना वैमानिक व्हायचा आहे त्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांना ४० ते ५० हजार रुपये मध्ये वैमानिक होता येते. या ठिकाणी आता ते शक्य होणार नाही. यामुळे लोकनेते, जनसेवा योगेश बापू ससाणे उपोषणाच्या माध्यमातून हडपसर व पुणे शहराच्या आसपासच्या नागरिकांना सही करून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत.
परंतु PPP मॉडेल वरती हस्तांतरित झाल्यास सदरचा १८७ रुपये दर बंद होऊन तो कितीही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुला -मुलींना ग्लायडर वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्यात लाखो रुपये मोजावे लागतील,
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टकार्ड च्या माध्यमातून आवाहन.
म्हणून या निर्णयाविरोधामध्ये जवळपास ६००० पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या असून २५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पोस्टकार्ड पत्र तयार करून पाठवली आहेत.






