क्राईम न्युज

सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला सुमारे ६ लाख ६५ हजार रुपयांचा ऑनलाईन फसवणूक ; कुंजीर वाडी…

संपादक सुनिल थोरात

पुणे (हवेली) : ट्रेडिंग स्टॉकमध्ये पैसे गुंतविल्यास जादा नफा मिळवून देऊ असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला सुमारे ६ लाख ६५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत २ सप्टेंबर ते १९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधील घडली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणी मृणालीनी गोपाळ सौपीन (वय ६५, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी बँकखातेधारक व वापरकर्ते, SBI CAP अँप धारक व वापरकर्ता, व्हॉट्सअप ग्रुप SBI CAP SECURITIES ग्रुप धारक व्यक्ती व वापरकर्ते, मंजु पाश्चिसिया व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक धारक व वापरकर्ता व https://chat.whatsapp.com/BZgICxJSL514NQ098CQINT,https://sbis2024.xyz लिंक धारक व वापरकर्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणालीनी सौपीन या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या आपल्या कुटुंबियांसमवेत कुंजीरवाडी परिसरात राहतात. एके दिवशी त्यांना मंजु पाश्चिसिया यांच्या फोनवरून व्हाटस अप वर लिंक आली. ती उघडल्या नंतर त्यांना SBI CAP app download करण्यास सांगितले. मृणालीनी सौपीन यांनी सदर ॲप डाउनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी आपण ट्रेडिंग स्टॉकमध्ये पैसे गुंतविल्यास जादा नफा मिळवून देऊ असे आमिष दाखविले. आणि त्यांना अकाउंट तयार करावयासला सांगितले. व त्यांना सुरवातीला त्या ॲपच्या नावाखाली नफा मिळवून दिला. त्यामुळे मृणालिनी यांचा यांवर विश्वास बसला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या खात्यावर ७ लाख ७ रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. त्या मोबदल्यात त्यांना केवळ ४२ हजार रुपयांचा परतावा मिळाला. उर्वरित ६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम परत मिळाली नाही. त्यांनी उर्वरित रकमेची मागणी केली असता, सायबर चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मृणालीनी सौपीन यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करीत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??