सुनेने घर, गाडीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून ५५ हजार रुपये आणले नाहीत. “म्हणून” विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ ; थेऊर…

संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : सुनेने घर व गाडीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून ५५ हजार रुपये आणले नाहीत या कारणांमुळे हवेली तालुक्यातील थेऊर येथे विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ कडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी १९ वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती सुशिल सिध्दराम बिल्लाळे, सासू मिना सिध्दराम बिल्लाळे, सासरा सिध्दराम गणपतराव बिल्लाळे व दीर स्वप्नील सिध्दराम बिल्लाळे (सर्व रा. गणेशवाडी थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते ४ जून २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीत घडली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि सुशिल बिल्लाळे यांचा प्रेमविवाह होता. विवाहनंतर दोघांचा संसार चांगला चालला होता. फेब्रुवारी मध्ये सासरे सिध्दराम बिल्लाळे यांनी माहेरकडून घर व वेस्पा मोटार सायकलचा हप्ता भरण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तिने आपल्या वडिलांकडून पैसे आणून दिले होते. त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा हप्ता भरण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली. त्यावेळीही तिने माहेरहून पैसे आणून दिले होते. यामुळे तिच्या सासर कडील मंडळींची पैशाची भुक वाढत गेली. त्यामुळे सिध्दराम किल्लाळे यांनी तिला ५५ हजार रुपये आणण्यास सांगितले. सुनेने यास नकार दिला असता सासू मिना बिल्लाळे यांनी “तु लग्नामध्ये काय घेवून आली नाही, तसेच लग्नात आमचा मान-पान देखील केला नाही,” असे बोलून शिवीगाळ केली. यावेळी सुनेने प्रतिउत्तर दिले असता पती सुशिल याने तिला हाताने मारहाण केली. व बेडरुममध्ये कोंडून ठेवले होते. तर दीर स्वप्नील याने दमदाटी केली.
पतीसह सासरच्या मंडळींनी संगणमत करून सुनेला माहेरहून पैसे आणण्याकरिता वारंवार शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला आहे. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चारही जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



