देश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
खरंच आनंदाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात केंद्रीय (सरकारी) कर्मचार्यांची मूळ पगारात महत्त्वपूर्ण वाढ अपेक्षित आहे. महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे:

नवी दिल्ली : सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी सध्या सगळ्यात जास्त चर्चा होत असेल, तर ती आहे आठव्या वेतन आयोगाची. गेल्या अनेक महिन्यांपासून यासंदर्भात चर्चा सुरू असून, प्रत्येकाच्या मनात हा एकच प्रश्न आहे नवीन वेतन आयोग केव्हा लागू होणार आणि त्यामुळं आपल्या महिन्याच्या पगारात किती फरक पडणार ?
म्हणूनच, आता अंदाज घेतला जात आहे की ८ व्या वेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्टर १.९२ ठेवला गेला, तर वेगवेगळ्या स्तरांवरील सरकारी कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार किती असू शकतो. यामध्ये आपण धरून चाललो आहोत की महागाई भत्ता (डीए) पूर्णपणे बेसिकमध्ये समाविष्ट होईल, आणि एचआरए म्हणजे घरभाडे भत्ता ‘एक्स’ शहरासाठी ३० टक्के असेल. ट्रान्सपोर्ट भत्ता (टीए)ही मोठ्या शहरांनुसार विचारात घेतलेला आहे.
आता हे लक्षात घ्या, ही आकडेवारी अधिकृत नाही ती फक्त एक अंदाजे तयार केली गेली आहे, ज्यातून तुम्हाला एक साधारण कल्पना मिळेल की नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार मिळू शकतो.
८ वा वेतन आयोग स्तर १ ते ७ साठी संभाव्य निव्वळ पगार
स्तरनिहाय संभाव्य पगार
स्तर, मूळ पगार, सुधारित बेसिक (1.92), HRA (30%), TA, एकूण पगार, कपात (NPS + CGHS), संभाव्य पगार याप्रमाणे खालील रचना…
1 ₹18,000, ₹34,560 , ₹10,368 , ₹1,350, ₹46,278, ₹3,706, ₹42,572
2 ₹19,900, ₹38,208, ₹11,462 , ₹1,350, ₹51,020, ₹4,071, ₹46,949
3 ₹21,700, ₹41,664, ₹12,499 , ₹3,600, ₹57,763, ₹4,416, ₹53,347
4 ₹25,500, ₹48,960, ₹14,688, ₹3,600, ₹67,248, ₹5,146, ₹62,102
5 ₹29,200, ₹56,064, ₹16,819 , ₹3,600, ₹76,483, ₹5,856, ₹70,627
6 ₹35,400, ₹67,968 , ₹20,390 , ₹3,600, ₹91,958, ₹7,247, ₹84,711
7 ₹44,900, ₹86,208, ₹25,862, ₹3,600, ₹1,15,670, ₹15,931, (+income tax अंदाज) ₹99,739
८ वा वेतन आयोग लागू झाला आणि खालील आधार (१.९२ फिटमेंट फॅक्टर, एक्स शहर HRA, उच्च TPTA) स्वीकारले गेले, तर वेतनरचना खालील प्रमाणे असू शकते:
सर्वात खालील स्तरापासून बोलायचं झालं, तर लेव्हल-१ मधील कर्मचाऱ्यांचे सध्या मूलभूत वेतन १८,००० रुपये आहे. नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार त्याचं सुधारित बेसिक सुमारे ३४,५६० रुपये होईल. त्यावर एचआरए आणि टीए धरून एकूण पगार ४६,२७८ रुपयांपर्यंत पोहोचतो. कपात (जसं की एनपीएस आणि सीजीएचएस) काढल्यानंतर या कर्मचाऱ्याचा निव्वळ पगार सुमारे ४२,५७२ रुपये राहतो.
लेव्हल-२ पासून ७ पर्यंत हा पगार हळूहळू वाढत जातो. लेव्हल-४ चा मूळ पगार २५,५०० रुपयांवरून जवळपास ४९ हजार रुपयांवर पोहोचतो आणि एकूण मिळकत ६७ हजार रुपयांपर्यंत जाते. त्या तुलनेत लेव्हल-७ मधील कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ४४,९०० रुपये असून, फिटमेंट फॅक्टरनुसार ते थेट ८६,२०८ रुपयांवर पोहोचते. त्यात एचआरए, टीए धरून एकूण पगार जवळपास १.१५ लाख रुपये होतो. अर्थात, अशा पातळीवर एनपीएस, सीजीएचएस, आणि साधारणपणे आयकराची कपात धरून त्यांचा निव्वळ हातात येणारा पगार ९९,७३९ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
हे सगळं पाहता, ८ वा वेतन आयोग लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. वाढलेला पगार, वाढलेला एचआरए आणि इतर भत्ते मिळाल्यानं त्यांना अधिक सुलभ आणि सन्माननीय जीवनशैली मिळू शकते. अर्थातच, हे सगळं अजूनही अंदाजांवर आधारित आहे, आणि प्रत्यक्षात आयोग काय शिफारसी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तरीसुद्धा, या आकड्यांतून हे स्पष्ट होतं की केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची आशा आणि अपेक्षा निर्माण झाली आहे – की येणाऱ्या काळात त्यांच्या मेहनतीचं योग्य चीज होईल आणि सरकारकडून त्यांना योग्य मोबदला मिळेल.
महत्त्वाचे
DA (महागाई भत्ता) : ८ व्या आयोगात तो बेसिकमध्ये समाविष्ट होऊ शकतो, म्हणून येथे 0% गृहित धरलेला आहे.
HRA: एक्स शहरासाठी ३० %, वाय/झेड शहरांसाठी हे २०%/१०% असेल.
TA: फक्त उच्च TPTA (दिल्ली, मुंबईसारखी शहरे) गृहित.
NPS + CGHS: सुमारे १०-१२% कपात मानली आहे.
Level 7 साठी कर (Income Tax): गृहित धरलेला आहे (₹६,६७०अंदाजे), जास्त उत्पन्न असल्यामुळे.
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार ?
आता येतो मूळ प्रश्न कि ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार ? तर याच उत्तर सध्यातरी इतकचं आहे कि सरकारकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना आलेली नाही, पण अपेक्षा आहे की २०२६ च्या आसपास, ७ व्या आयोगाच्या दशकपूर्तीनंतर, यावर निर्णय होईल.
मुख्य संपादक सुनिल थोरात



