जिल्हाराजकीयसामाजिक

पुणे जिल्हा परिषद गट क्र. ४१ मध्ये गवळी परिवाराची ताकद ; Adv. अनिता गवळींची उमेदवारी चर्चेत…

३५ वर्षांच्या संघर्षातून उभी राहिलेली नेतृत्त्वाची ठाम ओळख ; मतदारांमध्ये उत्साह...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत गट क्रमांक ४१ — लोणी काळभोर, कदमवाक वस्ती व वडकी परिसरात राजकीय वातावरण तापू लागले असून, या गटातून Adv अनिता सूर्यकांत गवळी यांची उमेदवारी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गवळी परिवाराची ३५ वर्षांची सामाजिक, राजकीय व ग्राहक चळवळीतील भक्कम कामगिरी लक्षात घेता, यावेळी या गटात मोठा राजकीय उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक ताकद, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत वाढलेल्या Adv. अनिता गवळी यांनी यापूर्वी २०१७ साली जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. अवघ्या १५९ मतांनी झालेला पराभव हा राजकीय दृष्टिकोनातून निर्णायक मानला जातो. त्या पराभवानंतरही त्या मैदान सोडले नाही, उलट गेली अनेक वर्षे सातत्याने लोकांमध्ये राहून प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे “या वेळी परिवर्तन अटळ आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

गवळी परिवाराचा राजकीय वारसा…

Adv. अनिता गवळी यांचे पती सूर्यकांत (आप्पा) गवळी हे माजी कॅबिनेट मंत्री (दर्जा) असून, महाराष्ट्र शासनाच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे २५ वर्षांचे नेतृत्व, राष्ट्रीय चर्मकार संघ व यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्यामुळे लोणी काळभोर व कदमवाक वस्ती गावांचे नाव राज्यपातळीवर पोहोचले.

महिलांचे नेतृत्त्व, संघर्षातून घडलेली उमेदवार…

Adv. अनिता गवळी या केवळ राजकीय वारशावर उभ्या राहिलेल्या नेत्या नसून, त्या स्वतःच्या संघर्षातून घडलेल्या आहेत. वकिली व्यवसाय सांभाळत त्यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न, शासकीय कार्यालयांतील अडचणी, ग्राहक फसवणूक, अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या उपाध्यक्षपदावरून त्यांनी महिला संघटन मजबूत केल्या.

सर्वधर्म समभावाची ठाम भूमिका…

गवळी परिवाराने राजकारणात कायम सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. वारकरी परंपरा, वारीतील सेवा, सर्व हिंदू सण, मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी, ख्रिश्चन चर्च कार्यक्रमातील सहभाग— या सर्व गोष्टी त्यांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करतात. “राजकारण हे समाज तोडण्यासाठी नाही, तर समाज जोडण्यासाठी असावे,” ही भूमिका त्यांनी कृतीतून दाखवली आहे.

आंदोलनशील नेतृत्वाची ओळख…

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी MIT कॉलेज येथे झालेल्या आंदोलनापासून ते गोरगरीब नागरिकांना घरे मिळावीत यासाठीच्या आंदोलनापर्यंत गवळी परिवार कायम रस्त्यावर उतरला आहे. अन्यायाविरोधात मोर्चे, रास्तारोको, निवेदने ही त्यांच्या राजकारणाची ओळख बनली आहे.

कोरोना काळात राजकारण नव्हे, माणुसकी…

कोरोना महामारीच्या काळात राजकीय फायद्याचा विचार न करता गवळी दाम्पत्याने स्वखर्चाने नागरिकांची सेवा केली. किराणा, औषधे, मास्क, सॅनिटायझर घरपोच पोहोचवले. यामुळे मतदारांमध्ये “काम करणारी नेतृत्त्व” अशी प्रतिमा अधिक ठळक झाली.

विकासाभिमुख अजेंडा…

पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, महिलांसाठी सुरक्षितता, युवकांसाठी रोजगार, ग्राहक हक्क, गोरगरीबांना न्याय— हा Adv. अनिता गवळी यांचा प्रमुख अजेंडा असून, जिल्हा परिषदेतून थेट जनतेसाठी लढणारे मजबूत नेतृत्व देण्याचा त्यांचा निर्धार आहे.

मतदारांमध्ये अपेक्षा, परिवर्तनाची चाहूल…

गट क्र. ४१ मधील मतदारांमध्ये यावेळी “अनुभव, संघर्ष आणि काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी द्यावी,” अशी स्पष्ट भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे Adv. अनिता गवळी यांची उमेदवारी केवळ पक्षाची नाही, तर सर्वसामान्य जनतेची उमेदवारी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??