जिल्हाराजकीयसामाजिक

लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकीत शिंदे गट शिवसेनेचा आक्रमक शड्डू ; उमेदवार जाहीर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकी जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक लढतीला निर्णायक वळण लागले असून, शिवसेना शिंदे गटाने उमेदवार जाहीर करत थेट आघाडी घेतली आहे. संघटनात्मक ताकद, स्पष्ट नेतृत्व आणि काटेकोर रणनीतीच्या जोरावर शिंदे गटाने या मतदारसंघात आक्रमक मुसंडी मारली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषद गटासाठी सिम्पल गणेश कांबळे, पंचायत समिती गण लोणी काळभोर–वडकीसाठी नंदिनी हेमंत कोळपे आणि पंचायत समिती गण कदमवाकवस्ती–लोणी काळभोरसाठी विजय भागवत दाभाडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवार जाहीर होताच परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे.

ही निवडणूक शिवसेना सचिव राम रेपाळे तसेच माजी राज्यमंत्री व पुरंदर–हवेलीचे आमदार विजय बाप्पु शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जात आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील शिरूर–हवेली मतदारसंघातील ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांची संघटनात्मक धुरा निलेश काळभोर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ते जिल्हास्तरावर पक्षाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहे.

प्रचार, बैठकां आणि रणनीतींचे सूत्र निलेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आखले जात आहे. पंचायत समिती गण क्रमांक ८२ मधील उमेदवार नंदिनी हेमंत कोळपे यांच्या कुटुंबाचा लोणी काळभोर, वडकी व परिसरात मजबूत जनसंपर्क आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील विकासकामांचा अनुभव आणि विश्वास त्यांच्या पाठीशी आहे.

जिल्हा परिषद उमेदवार सिम्पल कांबळे आणि पंचायत समिती उमेदवार विजय दाभाडे हे स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले आणि संघटनाशी घट्ट जोडलेले उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत. शिंदे गट शिवसेनेने बूथनिहाय नियोजन, प्रभावी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर प्रचाराचा वेग वाढवला आहे. निलेश काळभोर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हालचालींमुळे लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी परिसरात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

एकूणच, उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी, संघटनात्मक नियंत्रण, ठोस नेतृत्व चालणारी काटेकोर रणनीती यामुळे लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकीत शिंदे गट शिवसेना निर्णायक लढतीस सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??