जिल्हाराजकीयसामाजिक

लोणी काळभोर कदमवाक वस्ती–वडकी जि.प. गट क्रमांक ४१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सुजित कांबळे यांची सक्षम उमेदवारी…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर, कदमवाक वस्ती–वडकी जिल्हा परिषद गट क्रमांक ४१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शितल सुजित कांबळे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात निवडणूक वातावरणाला वेग आला असून, महिला नेतृत्वाचा एक सक्षम व विश्वासार्ह पर्याय मतदारांसमोर उभा राहिला आहे.

शितल कांबळे यांनी बी.ए., डी.एड. शिक्षण घेतले असून त्या शिक्षिका आहेत. प्रपंच सांभाळत सामाजिक कार्याची आवड त्यांनी जपली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजना मिळवून देणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे या कामात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.

त्यांचे पती Adv सुजित प्रल्हाद कांबळे हे सामाजिक कार्यकर्ते व वकील असून, त्यांच्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, कायदेशीर व जनहिताच्या प्रश्नांमध्ये नागरिकांना मदत करण्यात आली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, महिलांचे हक्क, गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या निमित्ताने Adv सुजित कांबळे यांनी लोणी काळभोर, कदमवाक वस्ती व वडकी येथील सर्व ग्रामस्थांना आवाहन करत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शितल सुजित कांबळे यांना भरघोस मतदान करून विजयी करावे. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, महिला व युवकांच्या प्रश्नांसाठी हा विजय महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

स्थानिक प्रश्नांची जाण, सामाजिक कामाचा अनुभव आणि लोकांशी असलेली जवळीक यामुळे शितल कांबळे यांची उमेदवारी सर्वसामान्यांमध्ये चर्चा विषय ठरत असून, या गट क्रमांक ४१ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मजबूत लढत दिली जात असल्याचे चित्र आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??