जिल्हाराजकीयसामाजिक

लोणी काळभोर वडकी पंचायत समिती हवेली गण क्रमांक ८२ मधून रेश्मा युवराज काळभोर यांची ताकदवान उमेदवारी…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर व वडकी पंचायत समिती हवेली गण क्रमांक ८२ मधून रेश्मा युवराज काळभोर यांनी उमेदवारी जाहीर केल्याने या गणातील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे. सामाजिक कार्याची आवड, महिलांच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ आणि मजबूत सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीमुळे त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे.

रेश्मा काळभोर या १२ वी शिक्षित असून गृहिणी आहेत. घराची जबाबदारी सांभाळत त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना विविध शासकीय योजना मिळवून देणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या कामात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

त्या आण्णासाहेब गणपत काळभोर, माजी उपसरपंच (लोणी काळभोर) यांच्या सून असून, त्यांचे पती युवराज विलास काळभोर हे वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव या उमेदवारीला बळ देणारा ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर युवराज विलास काळभोर यांनी लोणी काळभोर व वडकी येथील सर्व ग्रामस्थांना आवाहन करत सांगितले की, स्थानिक विकास, महिलांचे सक्षमीकरण व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रेश्मा युवराज काळभोर यांना भरघोस मतदान करून विजयी करावे. पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक प्रश्नांची जाण, जनतेशी असलेली नाळ आणि विकासाचा ठोस अजेंडा यामुळे रेश्मा काळभोर या हवेली तालुक्यातील पंचायत समिती गण क्रमांक ८२ साठी एक सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??