जिल्हाराजकीयसामाजिक

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाच्या विकाससूत्रावर निवडणूक लढवणार – अमोल टेकाळे…

कदमवाकवस्ती–लोणी काळभोर पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे यांची दमदार उमेदवारी जाहीर...

कदमवाकवस्ती–लोणी काळभोर (ता. हवेली) : येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६–३१ साठी कदमवाकवस्ती–लोणी काळभोर पंचायत समिती गणातून अमोल त्रिंबक टेकाळे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर केली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, तरुणाईचा उत्साह आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे अमोल टेकाळे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे.

समता नगर, कदमवाकवस्ती येथील रहिवासी असलेले अमोल टेकाळे हे १२ वी शिक्षित उद्योजक असून सामाजिक बांधिलकीतून राजकारणात सक्रिय होण्याचा त्यांचा निर्धार आहे. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या स्पष्ट विकाससूत्रावर आधारित कामकाज करत कदमवाकवस्ती–लोणी काळभोर गणाचा कायापालट करण्याचे ध्येय त्यांनी मांडले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगीण विकास शक्य आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार व युवक–महिला सक्षमीकरण या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा माझा संकल्प आहे,” असे अमोल टेकाळे यांनी सांगितले.

मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी जनतेकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून, मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे. स्थानिक पातळीवर उद्योजकीय अनुभव आणि समाजकारणातील सक्रियता यामुळे अमोल टेकाळे यांची उमेदवारी आगामी निवडणुकीत ताकदवान पर्याय म्हणून पाहिली जात आहे.

कदमवाकवस्ती–लोणी काळभोर गणात नव्या नेतृत्वाची चाहूल लागली असून, अमोल टेकाळे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??