जिल्हाशिक्षणसामाजिक

SPECTRUM KIDS चा भव्य वार्षिक स्नेहसंमेलन स्नेहसंमेलन ‘लक्ष्य’ उत्साहात संपन्न होणार ; चिमुकल्यांच्या कलागुणांचा रंगतदार आविष्कार…

मांजरी बु. (हडपसर) : मांजरी बु. येथील नामांकित SPECTRUM KIDS प्री-स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य अशा वार्षिक स्नेहसंमेलन ‘लक्ष्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, विठ्ठलराव शिवरकर रोड, फातिमा नगर, वानवडी येथे उत्साहात पार पडणार आहे.

या वार्षिक सोहळ्यात SPECTRUM KIDS मधील चिमुकले विद्यार्थी आपल्या कला, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी दर्शन घडवणार आहेत. नृत्य, नाट्यछटा, समूहगीत, कथाकथन, थीम आधारित सादरीकरण अशा विविध रंगतदार कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या लपलेल्या गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि मंचावर मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी देणे हा आहे. ‘लक्ष्य’ या नावाप्रमाणेच विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्दिष्टांParagraphकडे प्रेरित करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘पोस्टकार्ड मॅन ऑफ इंडिया’ म्हणून देशभरात ओळखले जाणारे सामाजिक उद्योजक प्रदीप लोखंडे उपस्थित राहणार आहेत. प्रदीप लोखंडे हे Rural Relations या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी आजवर 49 हजारांहून अधिक ग्रामीण भागातील गावांमध्ये कार्य केले आहे. ग्रामीण भारत आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांनी पोस्टकार्ड मोहिम, ग्रासरूट डेटा, ‘ज्ञान-की’ समुदाय ग्रंथालये तसेच तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासारख्या उपक्रमांतून भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि प्रेरणादायी परिमाण लाभणार आहे.

SPECTRUM KIDS, मांजरी बु. येथील संचालक, शिक्षकवर्ग आणि व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम काटेकोर नियोजनासह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकल्या कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??