मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅपचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारांना यादीतील आपले नाव तसेच मतदान केंद्राची माहिती सहज मिळावी यासाठी ‘मताधिकार’ हे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिकाधिक मतदारांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
या अॅपमध्ये मतदारांना नाव शोधण्यासाठी दोन सोपे पर्याय देण्यात आले आहेत. मतदार आपले संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक टाकून यादीतील नाव तपासू शकतात. तसेच, अॅपच्या माध्यमातून संबंधित मतदान केंद्राची माहितीही मिळणार आहे.
याशिवाय, मतदार यादी तपासण्यासाठी
https://mahasecvoterlist.in/�
हे अधिकृत संकेतस्थळही उपलब्ध असून, त्यावरील Search Name in Voter List या पर्यायावर क्लिक करून मोबाईल अॅपप्रमाणेच नाव किंवा EPIC क्रमांक टाकून मतदार यादीतील नाव शोधता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.
Editer sunil thorat



