जिल्हाशिक्षणसामाजिक

जेएसपीएम फार्मसी कॉलेजचा ‘डिपनोवा २०२६’मध्ये झेंडा ; राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला…

हडपसर (पुणे) : (दि. २ मार्च २०२६) Jayawant Shikshan Prasarak Mandal अंतर्गत कार्यरत Jayawant Institute of Pharmacy (हडपसर, पुणे) येथील डिप्लोमा विद्यार्थ्यांनी ‘डिपनोवा २०२६’ या राज्यस्तरीय प्रकल्प पोस्टर स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.

Directorate of Technical Education Maharashtra (डीटीई), मुंबई यांच्या अंतर्गत आयोजित या स्पर्धेचे आयोजन JSPM University, वाघोली येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान करण्यात आले होते. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत राज्यभरातील ६७ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

जेएसपीएमच्या फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘Sustainable Public Health: Safe & Smart Health Solutions for Health Challenges and Pharmacy’ या विषयावर प्रभावी आणि संशोधनाधिष्ठित पोस्टर सादर केले. त्यांच्या सर्जनशील मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे परीक्षकांची दाद मिळाली.

या यशाबद्दल विजेत्या गटाला रोख ₹१५,००० पारितोषिक, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पायल शेलके, समृद्धी हिंगणे, अयान पटेलरवींद्र गेहलोत या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. रविराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “डिपनोवा २०२६ मधील हे यश शैक्षणिक उत्कृष्टता व संशोधन कौशल्यांचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी असेच चमकत राहून नव्या यशकथा घडवाव्यात,” असे गौरवोद्गार काढले.

तसेच हडपसर संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे व सहसंचालक डॉ. मारुती काळबांडे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोनाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??