आरोग्यजिल्हासामाजिक

जागतिक महिला दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिलांसाठी आरोग्य शिबिर…

लोणी-काळभोर (ता. हवेली) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये ग्रामपंचायत महिला स्वच्छता कर्मचारी, महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच परिसरातील महिला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या आरोग्य शिबिरामध्ये पंचक्रोशीतील अनेक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित महिलांचा पोलीस स्टेशनतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिला दक्षता समितीच्या सदस्या स्मिता नार्टन, आळंदी म्हातोबाची येथील अंगणवाडी सेविका आशा भंडलकर आणि कु. शुभ्रा रवि आहेर यांनी मनोगत व्यक्त करत महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या विषयावर विचार मांडले.

यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी उपस्थित महिलांना महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. पुणे शहर पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून महिलांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय सहकार्य केल्याबद्दल विश्वराज हॉस्पीटल येथील वैद्यकीय पथकाचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नाळे, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पैठणे, महिला अंमलदार तसेच महिला पोलीस पाटील प्रियंका भिसे (कदमवाक वस्ती), रेश्मा कांबळे (थेऊर), सोनाली शिवरकर (आळंदी म्हातोबाची) आदी मान्यवर उपस्थित होते.

Editer सुनिल थोरात

 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??