जिल्हाराजकीयसामाजिक

अंबरनाथ मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक व राहिंज वस्तीतील रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर परिसरातील विकासकामांना चालना देत अंबरनाथ मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच राहिंज वस्ती येथे दत्ता शेंडगे यांच्या घरापासून महादेव कुंभार यांच्या घरापर्यंत रस्ता करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार (दि. १३ मार्च २०२६) रोजी उत्साहात पार पडला.

या विकासकामांचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे संचालक प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, जिल्हा परिषद सदस्या शितल सुजित कांबळे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच शरदनाना काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, माजी चेअरमन ज्ञानेश्वर काळभोर, माजी सरपंच भोलेनाथ शेलार, कालभैरव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत गायकवाड, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, पांडुरंग केसकर, चेअरमन गुरुदेव काळभोर, व्हा. चेअरमन अमोल कोळपे, संचालक सुभाष काळभोर, शिवसेना जिल्हा संघटक रमेश भोसले, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, प्रशासक सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, राहुल काळभोर, ग्रामपंचायत अधिकारी एस. एन. गवारी, तसेच सचिन काळभोर, रमेश काळभोर, अजय काळभोर, नितीन जगताप, सतीश काळभोर, विश्वनाथ रुपनर, नेता केसकर, गोरख मोरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांमुळे अंबरनाथ मंदिर परिसराचे सौंदर्य वाढणार असून राहिंज वस्तीतील नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनीही या विकासकामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??