जिल्हासामाजिक

घरपोच सेवेचा दावा फोल? गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा…

सिलेंडर साठी रांग, घरपोच सेवा गायब! एजन्सीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह...

लोणी काळभोर (ता. हवेली) : घरपोच सेवा देत असल्याचा दावा करणाऱ्या लोणी काळभोर गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरपोच सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात मागील काही दिवसांपासून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अनेकांना एजन्सीसमोर प्रत्यक्ष जाऊन सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. काही नागरिकांच्या मते, अनेक वेळा तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही या टंचाईची चर्चा सुरू आहे. विशेषतः इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. याचा परिणाम घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर झाल्याचे बोलले जात आहे. गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, सिलेंडर पुरवठा सुरळीत नसल्याने परिसरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी घरगुती तसेच व्यावसायिक सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याची चर्चा असून दुप्पट पैसे घेऊन गुप्तपणे सिलेंडर विक्री होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या संदर्भात लोणी काळभोर येथील एजन्सीचे संचालक राहुल क्षीरसागर यांनी सांगितले की, गॅसचा नियमित पुरवठा सुरू आहे. जेवढी बुकिंग होते तेवढ्याच प्रमाणात सिलेंडरचा सप्लाय केला जात आहे. गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांची मुदत असून सिलेंडर घेण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. एजन्सी कार्यालयाजवळ नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे काही वेळा घरपोच वितरणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??