
हडपसर (पुणे) : Tanaji Sawant यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वसंध्येला Jayawant Shikshan Prasarak Mandal च्या JSPM Educational Campus Hadapsar येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी आणि “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने करण्यात आले होते. कोविड काळापासून JSPM संस्थेमार्फत दर सहा महिन्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत, संचालक ऋषिराज सावंत, संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन इंजिनिअरिंग कॉलेजचे एनएसएस समन्वयक प्रा. डॉ. ए.बी. गावंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्यप्र फुल्लकुमार आडकर यांनी केले. या प्रसंगी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य देवकर, सीनियर कॉलेजचे प्राचार्य विनोद कुलकर्णी, प्राचार्य माने, देशमुख, पोतनीस, शेंडगे, चंद्रकांत हाके, मोसमी चौधरी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी Om Blood Bank यांचे सहकार्य लाभले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या समाजसेवेचे व सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रगती लागदिवे व विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशिद तसेच विवेक थोरात, प्रियंका महाजन, ऋतुजा दाते, स्वप्नाली सावंत, स्वाती माकोने, रूपाली शिंदे, प्रतिक्षा थोरात, सुरवसे, आकांक्षा मावशी व पांडुरंग पवार यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून अल्पोपहारासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Editer sunil thorat






