
लोणी काळभोर (ता. हवेली) : आज दिनांक १७ मार्च २०२६ रोजी नांदे पाटील वस्ती ते बल्लाळा मळा पानंद रस्ता तसेच लोणी काळभोर शिव ते फुरसुंगी पानंद रस्ता या महत्त्वाच्या रस्ते कामांचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. या कामाचा शुभारंभ प्रशांत काळभोर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे) यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी प्रताप शं. बोरकर (मा. चेअरमन सहन सह बँक लि.), राहुल आप्पा काळभोर (संचालक हवेली ता. खरेदी विक्री संघ), राजेंद्र य. काळभोर (मा. उपसरपंच), बाळासाहेब ज. काळभोर (मा. ग्रा. पं. सदस्य), अँड. सुजित कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), पांडुरंग केसकर (मा. ग्रा. पं. सदस्य), प्रशासक सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, मा. सरपंच राजाराम बापू काळभोर, मा. सरपंच राहुल काळभोर, मा. उपसरपंच गणेश कांबळे, सचिन काळभोर, गंगाधर काळभोर, मिलिंद कांबळे तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून शेतीमाल वाहतुकीलाही मोठी मदत होणार आहे. तसेच या विकासकामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Editer sunil thorat



