जिल्हाशिक्षणसामाजिक

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी…

पुणे : श्री विवेकानंद शिक्षण संस्था संचलित लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचा अभिमान उंचावला आहे. भारतासह विविध देशांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत या चिमुकल्यांनी गगनचुंबी भरारी घेत लोणी काळभोरच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.

या यशामध्ये इयत्ता दुसरीतील आरोही कुंडलिक वाघमारे आणि इयत्ता तिसरीतील वेदिका शेषेराव कराड या विद्यार्थिनींनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत विशेष कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना रोख पारितोषिक, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेत शाळेच्या एकूण 54 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, 21 विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल, तर 27 विद्यार्थ्यांनी ब्राँझ मेडल मिळवत शाळेचा लौकिक उंचावला. विद्यार्थ्यांच्या या दमदार कामगिरीमुळे पालक, शिक्षक आणि संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारशक्ती, स्पर्धात्मकता आणि जागतिक स्तरावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची जिद्द विकसित होते. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आगामी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना या यशापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षिका अंजली कवडे आणि दिपाली शेलार यांच्यासह सर्व विषय शिक्षकांचे संस्थेकडून विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच संस्थेचे सहसचिव प्रशासन एस. एम. गवळी, शाळेच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे आणि इन्चार्ज व सर्व समन्वयक यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??