जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

शेगाव येथे लोहार समाजाच्या एकत्रीकरणाची ऐतिहासिक सुरुवात ; राज्यभरातील २७ संघटनांचा सहभाग, एकजुटीचा ठोस निर्धार…

शेगाव येथे लोहार समाजाच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय सभा ; युवकांना ५०% प्रतिनिधित्वाचा ठाम निर्णय...

पुणे : श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिर परिसरात लोहार जाती-उपजाती संघटनांच्या एकत्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकत महाराष्ट्र राज्य लोहार जाती उपजाती संघटना समन्वय समितीच्या वतीने पहिली राज्यस्तरीय सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यातील विविध भागांतील सुमारे २७ संघटनांनी सहभाग नोंदवत लोहार समाजाच्या एकजुटीचा ठोस संदेश दिला.

विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पुणे व नाशिक विभागांतून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे कोणताही दिखाऊपणा न करता, स्टेज किंवा खुर्च्यांचा वापर टाळून सर्व पदाधिकारी एकत्र जमिनीवर बसून चर्चा करत असल्याचे साधेपणाचे व एकात्मतेचे चित्र पाहायला मिळाले.

समाजाच्या पैशांवर कार्यक्रम न घेता स्वतःच्या खर्चातून सभा आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. संघटनात्मक प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचा हा आदर्श नमुना असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

महत्त्वाचे निर्णय व चर्चा…

सभेत समन्वय समिती गठित करण्याची प्रक्रिया, प्रतिनिधी निवड निकष आणि समितीचे कार्य पारदर्शक ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. युवकांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा ठळकपणे समोर आला, तर ज्येष्ठांनी मार्गदर्शक भूमिकेत राहून नेतृत्व घडवावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

लोहार समाजासाठी एसटी आरक्षण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध आणि कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यासाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनांवर एकत्रित निर्णय घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचे ठरले.

तसेच आर्थिक विकास महामंडळाच्या योजना तळागाळातील व्यावसायिकांपर्यंत पोहोचवणे, समाजाचे आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करून शासन दरबारी प्रभावी मांडणी करणे, यावरही विचारमंथन झाले.

प्रतिनिधींच्या ठळक प्रतिक्रिया…

सभेत विविध मान्यवरांनी आपली मते स्पष्टपणे पुढील पप्रमाणे मांडली—

विनायक हरळ यांनी युवक-ज्येष्ठ समतोल राखत कोणालाही डावलू नये, यावर भर दिला.

ललित सपकाळ यांनी सर्वांनी एकत्र येत जिल्हास्तरावर संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

गणेश शिंदे यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.

सुरेश चंदनकर यांनी समन्वयाच्या जोरावर राज्यभर संघटन बळकट करण्याचा आशावाद व्यक्त केला.

सुरेश मांडवगडे यांनी आरक्षणासाठी सादर केलेल्या निवेदनावर सामूहिक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली.

माणिक शेंडे यांनी शिक्षण व शासकीय योजनांमध्ये समाजाने पुढे यावे, असे सांगितले.

चरणदास बावणे यांनी मतभेद विसरून एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.

आर. आर. बांगळे यांनी पारदर्शक व निष्कलंक कार्यपद्धतीवर भर दिला.

प्रभाकर लाड यांनी युवक-ज्येष्ठ एकत्र आल्यास विजय निश्चित असल्याचे सांगितले.

आनंद बावणे यांनी युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याची कणखर भूमिका मांडली.

विजय पोहनकर यांनी समितीला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले.

जितेश मेश्राम यांनी पदलालसा टाळण्यासाठी सर्वांना अधिकार देण्याचा विचार मांडला.

मधुकर शेंडे यांनी बदल स्वीकारत युवकांना सन्मानाचे स्थान देण्याची गरज व्यक्त केली.

अजय खंडागळे यांनी सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेली सक्षम समिती उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.

सोमवंशी यांनी दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अ‍ॅड. हिवाळे यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शासनदरबारी लढा देण्याचे आश्वासन दिले.

प्रमुख महाराष्ट्रातील लोहार सहभागी संघटना…

या सभेत राज्यभरातील विविध संघटनांचा सहभाग होता. त्यामध्ये ले. लोहार युथ फाऊंडेशन, वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ (नागपूर), कोकण विभागीय लोहार समाजसंघ, अखिल लोहार समाज विकास संघ, श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा (आळंदी), लोहार समाज मित्र मंडळ (नागपूर), श्री विश्वकर्मा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट (अकोला), संभाजीनगर जिल्हा गडिलोहार विकास संघ, श्री विश्वकर्मा ट्रस्ट (मंचर), जळगाव गाडीलोहार समाज सुधारक मंडळ, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय युवा मंच (धुळे), धुळे जिल्हा लोहार गाडीलोहार समाज संघटना, नाशिक जिल्हा लोहार समाज विकास संघ, महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ (गडचिरोली), लोहार समाज पोटजाती विकास संस्था (चंद्रपूर), प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय सामाजिक संस्था (यवतमाळ), लोहार समाज सेवा मंडळ (गडचांदूर), सकल लोहार समाज विकास मंच (फलटण), हिंदू लोहार समाज, पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ, श्री जागृतेश्वर विश्वकर्मा वंशीय देवस्थान कमिटी (नागपूर), श्री विश्वकर्मा लोहार समाजसेवा बहुउद्देशीय संस्था (भुसावळ), गाडी लोहार समाज संघटना (भद्रावती), गाडी लोहार समाज महासंघ (धुळे), राज्य लोहार गाडी लोहार समाज संघटना (सातारा) व लोहार समाज संस्था (वर्धा) यांचा समावेश होता.

लोहार समाजातील प्रमुखांची पुढील दिशा…

सभेच्या शेवटी एप्रिल महिन्यात पुणे येथे पुढील राज्यस्तरीय सभा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. समन्वय, पारदर्शकता आणि एकजूट या त्रिसूत्रीवर समाजाची पुढील वाटचाल ठरविण्यात आली. एकूणच, शेगाव येथील ही सभा लोहार समाजाच्या एकत्रीकरणासाठी ऐतिहासिक ठरत असून, राज्यभर संघटनात्मक बळकटीसाठी नवी दिशा देणारी ठरली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??