क्राईम न्युज

लोणी काळभोरात अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त ; 490 लिटर दारू जप्त, 2 आरोपींना अटक…

लोणी काळभोर (ता. हवेली) : आरोग्यास घातक ठरणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या विक्रीवर लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी दुपारी मोठी कारवाई केली. पोलिसांच्या या छाप्यात एकूण 490 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, सुमारे 51 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच, या प्रकरणी शिवाजी सुभाष फंड (वय 27) आणि सागर प्रकाश काळभोर (वय 28) यांना अटक करण्यात आली आहे.

छाप्याचा तपशील…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरातील मोगले वस्ती जवळील कॅनॉल परिसरात दुपारी सुमारे दीडच्या सुमारास छापा टाकण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत उघड झाले की, एक पत्र्याचे घर अवैध हातभट्टी दारू साठवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर विक्रीसाठी वापरले जात होते.

छाप्यात 35 लिटर क्षमतेच्या 83 प्लास्टिक कॅनपैकी 14 कॅन दारूने भरलेले आणि 300 लिटर क्षमतेचा प्लास्टिक बॅरल जप्त करण्यात आला. पंचनामा करून नमुने जप्त केले गेले असून, उर्वरित दारू नष्ट करण्यात आली आहे.

आरोपींची माहिती आणि कबुली…

तपासात समोर आले आहे की, आरोपी शिवाजी सुभाष फंड आणि सागर प्रकाश काळभोर यांनी ही दारू बाहेरून आणली असून, त्यांनी आलताफ अख्तर उर्फ अली (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याकडून ही दारू घेत असल्याचे कबूल केले आहे.

पोलीसांची कारवाई…

ही कारवाई पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, हवालदार व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली. पोलिस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

सामाजिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी…

पुणे शहर पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जाहीर केला असून, लोणी काळभोर परिसरात अवैध हातभट्टी, जुगार व इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू असताना ही मोहीम कितपत प्रभावी आहे, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस उपायुक्त (झोन 6) डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क साधता आला नाही.

पुढील कारवाई….

पोलीस ही कारवाई सुरू ठेवून अवैध दारू विक्रीसंबंधीचे सर्व तपशील उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??