
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : 19. ता. येथील रिव्हर व्ह्यू सिटी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रिव्हर व्ह्यू सिटी फाल्कन प्रिमिअर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेला रिव्हर व्ह्यू सिटी क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्थानिक स्तरावर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल १२ संघांनी सहभाग नोंदवत चार दिवस रंगलेल्या सामन्यांमधून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले.
या स्पर्धेत फाल्कन ब्लास्टर्स, फाल्कन एवेंजर्स, फाल्कन डॉमिनेटर्स, फाल्कन फायटर, फाल्कन चॅम्पियन्स, फाल्कन फ्युरिसस, फाल्कन गेम चेंजरस्, फाल्कन जी फोर्स, फाल्कन इगल्स, फाल्कन एक्सप्लोसिव ७, फाल्कन डिफेंडर्स आणि फाल्कन काम कंटेंडर्स या संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा उत्कृष्ट समन्वय पाहायला मिळाला.
स्पर्धेचे सामने दोन टप्प्यांत पार पडले. पहिला टप्पा ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी तर दुसरा टप्पा १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सामने खेळवण्यात आले. चारही दिवस मैदानावर क्रीडारसिकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळच्या सत्रात शिस्तबद्ध आणि तांत्रिक खेळ पाहायला मिळाला, तर सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात रंगलेले सामने विशेष आकर्षण ठरले.
स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक ठरला. लीग फेरीपासूनच संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला, तर गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखून धरले. क्षेत्ररक्षणातही खेळाडूंनी अप्रतिम झेल घेत आणि धावा वाचवत प्रेक्षकांची दाद मिळवली.
अंतिम सामन्यात फाल्कन ब्लास्टर्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि संतुलित खेळ करणाऱ्या या संघाने अंतिम सामन्यातही आपली श्रेष्ठता सिद्ध केली. फाल्कन एवेंजर्स संघाने द्वितीय क्रमांक मिळवला, तर फाल्कन डॉमिनेटर्स संघाने तृतीय स्थान पटकावले.
विजेता संघ – फाल्कन ब्लास्टर्स (खेळाडू)
सौरभ देवडेकर, प्रशांत कळसकर (महाराष्ट्र पोलीस), प्रशांत जुंदळे, दिपक धायगुडे, शशांक बनकर, किरण डोंगरे, सूर्यकांत यादव, अमर पाटील, संदीप शेलार, मोहित माथुर आणि अनिकेत गवळी (कर्णधार)
कर्णधार अनिकेत गवळी यांच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्तम रणनीती आणि संघभावना दाखवत विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये संघाने संतुलित कामगिरी केल्यामुळे त्यांना विजेतेपद मिळवणे शक्य झाले.
या स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल गायकवाड, सचिन सपकाळ, प्रशांत कळसकर (महाराष्ट्र प्रशांत रणजित जाचक, अमोल हाके, प्रशांत गजरे, अनिकेत गवळी, शहाजी दुधभाते यांच्यासह विष्णू तहकीक आणि प्रताप पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडली.
खेळाडूंना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेत खेळाडूंना उत्साहाने प्रोत्साहन दिले. एकूणच, फाल्कन प्रिमिअर लीग ही स्पर्धा कदमवाकवस्ती परिसरातील क्रीडाक्षेत्रासाठी एक मोठा टप्पा ठरली असून भविष्यातही अशा भव्य स्पर्धांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



