कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

शेवाळे ॲग्रो फार्मचा ‘शिवसमर्थ देवगड हापूस आंबा महोत्सव’ गाजला; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट, उपक्रमाचे कौतुक…

शेवाळेवाडी (पुणे) : पुणे जिल्ह्यातील शेवाळेवाडी परिसरात युवा उद्योजक शेतकरी राहुल शेवाळे यांच्या ‘शेवाळे ॲग्रो फार्म’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसमर्थ देवगड हापूस आंबा महोत्सवा’ला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देत आंब्याची चव घेतली आणि उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील देवगड भागातील हापूस आंब्यांची बाग आधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. या बागेतील ताजे आंबे थेट ग्राहकांसाठी महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्राहकांना अस्सल चव अनुभवण्याची संधी मिळत आहे.

महोत्सवादरम्यान कृषिमंत्री भरणे यांनी आंब्याची चव घेत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन केले. या अभिनव उपक्रमामुळे शेती क्षेत्रात नवे प्रयोग आणि संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आयोजक राहुल शेवाळे यांच्यासह सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे, विलास शेवाळे, संभाजी हाके, संजय कोद्रे, विजय कोद्रे, सुनील शेवाळे, अतुल शेवाळे, मंगेश शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, हभप रामदादा शेवाळे तसेच माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बाजारात बेंगळुरू व इतर भागातील केमिकलद्वारे पिकवलेले आंबे ‘कोकण हापूस’च्या नावाखाली विकले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले. याला पर्याय म्हणून त्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला अस्सल देवगड हापूस ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

एआय तंत्रज्ञानामुळे आंब्याच्या उत्पादनाची गुणवत्ता, देखभाल आणि निगा अधिक प्रभावीपणे राखली जाते. त्यामुळे ग्राहकांना खऱ्या आंब्याची नैसर्गिक चव अनुभवता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांनी आंब्याच्या दर्जा आणि चवीचे भरभरून कौतुक केले आहे.

या महोत्सवाला भेट द्या आणि सुमधुर आंब्याचा आनंद घ्या,” असे आवाहन राहुल शेवाळे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच हा सेंद्रिय देवगड हापूस देशभरातील विविध राज्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??