क्राईम न्युजसामाजिक

११ वर्षांनंतर न्याय : आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणात मुख्य आरोपीला ३ वर्षांची सक्तमजुरी…

सौजन्य फोटो Ai

लोणी काळभोर (ता. हवेली) : (दि. २१ एप्रिल २०२६) तब्बल ११ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या आत्महत्येस प्रवृत्त (भा.द.वि. कलम ३०६, ३४) प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथील मा. न्यायाधीश ए.आय. पेरमपल्ली यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी मंगल सचिन अडागळे (रा. लोणी काळभोर) हिला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने तिला ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणातील इतर आरोपी गुलाब गणपत पवार, प्रकाश गुलाब पवार, अनिल गुलाब पवार, रेखा अनिल पवार, कमलाबाई गुलाब पवारलिला प्रकाश पवार (सर्व रा. राहु, खेडेकर वस्ती, ता. दौंड, जि. पुणे) यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

सदर गुन्हा (रजि. नं. ३३२/२०११) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस (सध्या लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर) यांनी केला होता. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता प्रदीप गेहलोत यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.

या खटल्यात एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. विशेषतः हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल हा निकालासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

या प्रकरणाच्या यशस्वी पैरवीसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच रत्नदीप बिराजदार (पोलीस उपनिरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन) यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोर्ट पैरवीसाठी म.पो.ह.वा. ललिता कानवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद ज्ञानेश्वर कांबळे, म.पो.ह.वा. अश्विनी पवार आणि पोलीस शिपाई अशोक शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पीडित पक्षाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??