जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न…

पुणे : (दि. २१ एप्रिल २०२६) २०१-बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीस सामान्य निरीक्षक डॉ. बिद्या नंद सिंह, पोलीस निरीक्षक एन. कोलंची, खर्च निरीक्षक बनोथ अखिल राम नाईक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जितेंद्र डूडी तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची तयारी, मतदान साहित्याचे नियोजन, वाहतूक आराखडा तसेच वितरण व स्वीकृती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाकडून नॉन-बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी, शस्त्र जमा (Arms Deposit) प्रक्रिया तसेच एफएसटी, एसएसटी, क्यूआरटी आणि आरसीपी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मतदारसंघात दारूबंदी आदेश लागू करून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले.

तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, फ्लाइंग स्क्वॉड आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना खर्च नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला असून कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, तक्रारींचे तात्काळ निवारण करावे व निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??