क्राईम न्युजमहाराष्ट्र

बुधवार पेठेत कुंटणखान्यांवर कारवाई; ४ फ्लॅट सील, ३ बांगलादेशी महिलांना अटक…

पुणे : बुधवार पेठ परिसरातील कुंटणखान्यांवर फरासखाना पोलीस स्टेशन यांनी मोठी कारवाई करत चार फ्लॅट एक वर्षासाठी सीलबंद केले असून अनाधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.

तपासादरम्यान कुंटणखाना चालविणारे तसेच जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करत संबंधित फ्लॅट सील करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार बेगम बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ३०१, न्यू वेलकम बिल्डिंगमधील दोन फ्लॅट तसेच दाणे आळी येथील वाड्यातील एक खोली असे एकूण चार ठिकाणे सीलबंद करण्यात आली आहेत.

दरम्यान, पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले यांच्या सूचनेनुसार रेड लाईट परिसरात बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीसांनी बुधवार पेठ परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान जोशना शकुर अली, कुलसुम खातून आणि अंजुरा बेगम या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत या महिला मागील महिनाभरापासून बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास असून बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावेही मिळाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??