जिल्हासामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कवडीपाट परिसरात उत्साहात ; भव्य मिरवणुकीतून दिला सामाजिक ऐक्याचा संदेश…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कवडीपाट परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते राकेश लोंढे यांच्या पुढाकारातून आणि स्थानिक तरुणांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कवडीपाट टोल नाका ते गुजर वस्ती या मार्गावर निघालेल्या मिरवणुकीत निळ्या झेंड्यांची दिमाखदार मिरवणूक आणि “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. विविध ठिकाणी फुलांची उधळण करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या मिरवणुकीत अ‍ॅड. राहुल झेंडे, सामाजिक कार्यकर्ते सुशिल महाराज काळभोर, विशाल गुजर, नितीन टिळेकर, समाधान साळवे, शंकर देडे, सचिन भोसले, अभिजित पाचकुडवे, विशाल चौरघडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात शिक्षण, समता आणि बंधुभाव जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य सिमीता अगतराव लोंढे आणि आकाश काळभोर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच सरपंच चित्तरंजन गायकवाड, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अभिजित बडदे व ग्रामपंचायत सदस्य पप्पू बडदे यांनीही उपस्थित राहून मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस कर्मचारी आण्णा माने, बापू वाघमोडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी चोख सुरक्षा व्यवस्था राखत मिरवणूक सुरळीत पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कार्यक्रमस्थळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ही भव्य मिरवणूक सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि आंबेडकर विचारांचा प्रसार करणारी ठरली. नागरिकांनी मोठ्या शिस्तीत व उत्साहात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??