
डाँ गजानन टिंगरे
इंदापूर (पुणे) : आनंदनगर, दि. १ मे २०२६ : बुद्ध पौर्णिमेनिमित्त आनंदनगर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
भारतासह नेपाळ, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश यांसारख्या अनेक आशियाई देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात भगवान बुद्धांच्या शिकवणीवर प्रकाश टाकण्यात आला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जगातील दुःखांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मानवजातीसाठी ‘चार आर्य सत्य’ आणि ‘अष्टांग मार्ग’ यांचा उपदेश करून दुःखमुक्त जीवनाचा मार्ग दाखविला.
कार्यक्रमात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंनगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, आनंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंच रोहित मोहोळकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामेश्वर माने, उदय देशमुख, राजेंद्र काळे, ग्रामसेवक योगेश मिसाळ, राजेंद्र जाधव, विजय बनसोडे, दिलीप लोकरे, अनिल लोंढे, अश्विन जाधव, अमित मोरे, पुंडलिक सोनवणे, पंकज बनसोडे, बाबा धालपे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सियोन राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लोंढे यांनी केले होते. कार्यक्रमातून भगवान बुद्धांच्या विचारांचे अनुसरण करून जीवनातील वाईट प्रवृत्तींचा त्याग करावा आणि शांततामय जीवन जगावे, असा संदेश देण्यात आला.
Editer sunil thorat




