सामाजिक

एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये “मदर्स डे” उत्साहात साजरा…

लोणी काळभोर, दि. ३० : येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये “आई आणि मी” या संकल्पनेवर आधारित “मदर्स डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आई आणि मुलांमधील नात्यातील जिव्हाळा अधिक दृढ करण्याबरोबरच पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित माता व शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा अँथनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर सर्व मातांचे “सुपर मॉम” बॅज देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आईंसाठी विविध कला सादरीकरणे व नृत्याविष्कार सादर करून वातावरण आनंदमय केले.

आई आणि मुलांनी एकसारख्या रंगातील पोशाख परिधान करून सादर केलेल्या रॅम्प वॉकने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. “क्राऊन मेकिंग” या आर्ट अँड क्राफ्ट उपक्रमात मातांनी आपल्या लहानग्यांसोबत सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडवले. त्यानंतर आयोजित पूल पार्टीमध्ये मातांनी उत्साहाने सहभाग घेत संगीत व नृत्याचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी शाळेच्या वतीने सर्व मातांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे “मदर्स डे” कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??