सामाजिक
राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र पदी संतोष लांडे यांची निवड…

पुणे : (दि.२०) रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश महाडिक यांच्या हस्ते तसेच पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुका अध्यक्ष गोपाळ भालेराव यांच्या शिफारसीने संतोष लांडे. यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र पदी नियुक्ती करण्यात आली.
संतोष लांडे यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढील कार्यकारिणीस पुढील कामास तत्पर हजर राहून कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विभागीय सचिव. पश्चिम महाराष्ट्र पदी संतोष लांडे यांची नियुक्ती झाल्या बद्दल. सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. पत्रकारिता क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.



