पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील एका ट्रक चालकाने व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवार (१५ जानेवारी) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. एकुलत्या एका तरुण मुलाने आत्महत्या केल्याने लोणी काळभोर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा विष्णू उबाळे (वय २६, रा. महात्मा फुले नगर, माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू उबाळे हे ट्रक चालक असून कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यांचा मोठा मुलगा कृष्णा हा सुद्धा ट्रक चालक म्हणून काम करतो. तर मुलीचा विवाह झाला असून तो सासरी नांदते.
बुधवारी कृष्णा उबाळे हा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीत गेला व दरवाजा आतून बंद केला. सायंकाळचे सात वाजले तरी मुलगा दार उघडत नसल्याचे लक्षात येताच वडील विष्णू उबाळे यांनी दरवाजा वाजविला. परंतु, आतून कसलाही प्रतिसाद मिळत नाही हे पाहून विष्णु उबाळे यांनी नागरिकांच्या साहाय्याने खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा मुलगा कृष्णा हा साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन फॅनच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कृष्णा उबाळे यांना खाली उतरवले. व पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
कृष्णा उबाळे याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्याने आत्महत्या करण्यापूर्वी बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारांस आपल्या मोबाईल वर ‘माँ आपका लाडला कभी भी दुनिया छोड सकता है!’ अशी व्हिडिओ क्लिप स्टेटसवर ठेवली आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा