गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सोन्या घायाळसह त्याच्या ५ साथीदारांवर मोका ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार..

तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे याचबरोबर अॅट्रॉसिटी, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, विनयभंग, पोक्सो, धमकी देणे व गावठी हातभट्टी तयार करणे असे संघटित गुन्हेगारी करून लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सोन्या घायाळसह त्याच्या ५ साथीदारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे आदेश पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
सोन्या ऊर्फ निखील घायाळ (वय ३२, रा. लोणी स्टेशन कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्रीकांत मल्लीकार्जुन मेमाणे (वय २६), गणेश रावसाहेब गोडसे (वय २५), अविनाश महादेव कामठे (वय २५) अशी मोका लागलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातील दोन जण ओंकार धनंजय काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) व रोहित अनिल चौधरी (रा.सोरतापवाडी, ता. हवेली) यांना लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवार (२१ जानेवारी) रोजी अटक केली आहे.
सोन्या घायाळ हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून सध्या तडीपार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन, त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलूम जबरदस्ती करुन किंवा अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारी टोळी तयार केली असुन सदर टोळीने मागील १० वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, अॅट्रॉसिटी, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, विनयभंग, पोक्सो, बलादग्रहण करणेसाठी क्षती पोहोचवण्याची धमकी देणे व गावठी हातभट्टी तयार करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.
सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन, त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भितीदायक वातावरण व दहशत निर्माण झाली होती. या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मोकाचा प्रस्ताव तयार करून अपर यांच्याकडे पाठविला होता. मनोज पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आरोपींवर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मंजूर केला आहे
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलिस हवालदार गणेश सातपुते, तेज भोसले, प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, मंगेश नानापूरे व योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले आहेत.



