क्राईम न्युज

पुण्यात अफिमची विक्री, राजस्थानच्या तरुणाकडून २१ लाखांचे अफिम जप्त..

पुणे : पुणे शहरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी दाखल झाल्याचे अनेकदा आढळून आले आहे. एमडी ड्रग्सनंतर आता अफिम विक्रीसाठी आणण्यात आल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधून आलेल्या तरुणाकडे हे अफिम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सदर तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे २१ लाख रुपयांचे अफिम जप्त करण्यात आले आहे.

राजस्थान येथील नाथुराम जीवणराम जाट असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना पुणे शहरातील कोंढवा परिसरात असणाऱ्या उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे एक इसम उभा होता. त्याचे हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेवुन तो संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले.

बॅगमध्ये आढळला एक किलो अफिम

पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितले. दरम्यान पोलिसांना त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे अधिक संशय आला. यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये तब्बल एक किलो इतके अफीम मिळून आले. या १ किलो ९० ग्रॅम अफिमची किंमत वीस लाख ८० हजार इतकी आहे. हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

झटपट पैसे कमविण्यासाठी पत्करला मार्ग
आरोपी हा फर्निचर बनवण्याच्या कामासाठी यापूर्वी पुणे शहरामध्ये आला होता. मात्र अल्पावधीत पैसे कमावण्यासाठी अफिम विक्री करण्यासाठी पुण्यात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान संशयित आरोपीच्या विरोधात कोढवा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??