जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
दौंडमध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; आषाढी वारीतला काळा अध्याय!… दौंडचे आमदार राहुल कुल यांची विधानसभेत अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी…
पंढरपूरला जाताना दौंडमध्ये भीषण घटना; वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर अत्याचार...

मुंबई : पुणे-सोलापूर महामार्गावरून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या महिला भाविकांना लुटून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत सोमवारी पहाटे साडे चार वाजताच्या दरम्यान घडली होती.
या घटनेवर विधानसभेत बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी धक्कादायक माहिती दिली.
पंढरपुरला देव दर्शनासाठी इको चारचाकी गाडीने पुणे सोलापुर महामार्गावरून जात असताना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील एका टपरी जवळ चहा पिण्यासाठी थांबलेल्या भाविकांना दोन आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली. तसेच जबरदस्तीने महिलांच्या अंगावरील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दगिने लुटले होते. अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भजनी मंडळातील असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतानाच आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोका अशी विनंती त्यांनी गृहखात्याला केली. तसेच स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरण जलदगदी न्यायालयात चालवा, अशी मागणीही यावेळी आमदार कुल यांनी सभागृहात केली.
चहा घेण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाला लुटून त्यातील एका अल्पवयीन मुलीला नराधम घेऊन गेला. गळ्याला कोयता लावून चहाच्या टपरीच्या पाठीमागे असलेल्या झाडीमध्ये नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुख्य संपादक सुनिल थोरात



