जे.एस.पी.एम. फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा औषधनिर्माण कंपनी मध्ये अभ्यास दौरा संपन्न: औषध क्षेत्रात भारतीय कंपनीचा मोलाचा वाटा…

पुणे (हडपसर) : भारताच्या औषध निर्मितीचा पाया म्हणजेच मेडिसिन कंपनी त्यातील नावजेली व नुकतीच गोल्डन जुबली पूर्ण केलेल्या Nulife कंपनीला जे. एस. पी. एम. जयवंतराव सावंत डिप्लोमा फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या मुलांची Nulife कंपनीला भेट.
दिनांक १९ मार्च २०२५ ला Nulife pharmaceuticals या कंपनी मध्ये अभ्यास दौरा आयोजित केला होता सदर कंपनीला प्रथम वर्षाच्या ५५ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.सदर भेटीत विविध प्रकारचे औषधे तयार करण्याचे तंत्रज्ञान व त्यांची तपासणी याचे मार्गदर्शन केले गेले, या अभ्यास दौऱ्यात प्रथम न्यू लाईफचे एमडी उमेश त्रिवेदी यांनी मुलांना कंपनीची माहिती करून दिली यानंतर वर्क्स मॅनेजर माधुरी देशमुख, प्रोडक्शन मॅनेजर राजेश जाधव, क्वालिटी ॲशुरन्सच्या मॅनेजर सविता गुप्ते यांचे मुलांना मार्गदर्शन मिळाले.
सदर अभ्यास दौरा उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर प्रशांत सस्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच विद्यार्थ्यानी विविध प्रकारचे प्रश्न विचारून नवीन माहिती मिळवली. सदर माहीत ही त्यांना भविष्यामध्ये उत्तम औषधनिर्मिती कारणासाठी उपयुक्त पडेल, कंपनीमध्ये औषधाच्या गुणवत्ता तपासणी व नवीन मार्गदर्शक तत्वे याबद्दल सखोल माहिती मुलांना मिळाली तसेच सदर प्रथम आदिती वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क यालाही भेट दिली. व नवीन नवीन शोध व इतिहासाची माहिती घेण्यात आली.
सदर अभ्यास दौरा पार पाडण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत, कॅम्पस डायरेक्टर डॉ.वसंत बुगडे व डॉ.संजय सावंत तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले. सदर कार्यक्रम प्रा. स्वप्नील गाडेकर यांनी आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाला हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत डॉ. वसंत बुगडे हे उपस्थितीत होते.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. सागर सोनार प्रा. प्रगती लगदिवे, प्रा अजय साळुंके, क्षितिजा डोंबाळे, स्वाती माकोने, विवेक थोरात, प्रियंका महाजन, स्वप्नाली सावंत, वैष्णवी तानवडे, पवार काका, सुरवसे मावशी यांनी सहकार्य केले.



