क्राईम न्युज

पोलीस बतावणी तसेच हातचलाखी करुन वयोवृध्दांना गंडा घालणारा सराईत जेरबंद ; युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहरची कारवाई…

पुणे : वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक व गुन्हे उघडकीस आणणेकामी युनिट ६ कडुन प्रयत्न सुरु असताना युनिट ६ कडील अंमलदार पो. हवा. नितीन मुंढे, पो. हवा. कानिफनाथ कारखेले, यांना मिळालेल्या गोपनिय बातमी नुसार कारवाई करण्यात आली.

पोलीस बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांचे दुर्बलतेचा गैर फायदा घेवुन दागिणे चोरनारा इसम नामे इसम नामे हमीद अफसर खान वय ३० वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे यास आज दि. १९/०४/२०२५ रोजी सकाळी ११/०० वा. चे सुमारास मोटार सायकल सह लोणी काळभोर गाव स्मशानभुमी येथुन ताब्यात घेवून गुन्हे शाखा, युनिट ६ येथील कार्यालयामध्ये घेवुन येवुन त्याचेकडे विश्वासात घेवुन चौकशी करता, त्याने त्याचे साथीदार सह पुणे शहर व आजुबाजुचे परिसरामध्ये हातचलाखीने फसवणुक करुन चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्याचे कडुन उघडकीस आणलेले गुन्हे खालील प्रमाणे,

१. कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.१३४७/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१६(२), ३१८ (४) अन्वये

२. पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं.२९/२०२५ भा. न्या.सं. कलम ३१८(४) अन्वये

३. पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं.१९५/२०२४ भा.दं. वि. कलम ४२०,३४ अन्वये

४. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं.५७९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये

५. कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.१६९/२०२५ भा. न्या. सं. कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) अन्वये

६. कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं.१०६/२०२४ भा.दं.सं. कलम ४०६,४२०,३४ अन्वये

७. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं.५४७/२०२४ भा.दं. वि. कलम ४२०,३४ अन्वये

८. सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.३२४/२०२३ भा.दं. वि. कलम ४०६,१७० अन्वये

   …हस्तगत मुद्देमाल…

१) वेगवेगळया वर्णनाचे सोन्याचे दागिने एकुण ९६ ग्रॅम वजनाचे एकुण कि.रु ७,६८,०००/-रुपये असे

२) १,००,०००/- रु. किंमतीची एक काळया रंगाची टीव्हीएस कंपनीचे अपाचे RTR 200 मोटार सायकल अशा प्रकारे एकुण ८ हातचलाखी करुन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण आरोपी कडुन एकुण ८,६८,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, प्रभारी पो. नि. वाहीद पठाण, स.पो.नि.मदन कांबळे, पो.उप.नि रामकृष्ण दळवी, पो. अमंलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती नरवडे, यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??