क्राईम न्युज

५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना, घराचे कुलूप तोडून चोरी, मांजरी येथील घटना…

पुणे (हडपसर) : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

हडपसर भागातील मांजरी परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत वैशाली रमेश देवकुळे (वय ४०, रा. लटके वडापाव दुकानाजवळ, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, देवकुळे यांचे घर बंद होते. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेला. गुरुवारी देवकुळे बाहेरगावाहून परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार शिंगाडे अधिक तपास करत आहेत.

                           एटीएमची तोडफोड…

मांजरी भागातील बेल्हेकर वस्तीत बँकेच्या एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत हर्षद सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाणयात तक्रार दिली आहे. मांजरीतील बेल्हेकर वस्ती, तसेच या भागातील दोन एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??